महाराष्ट्र शाहीर - एका गायकाची गोष्ट
top of page

महाराष्ट्र शाहीर - एका गायकाची गोष्ट

महाराष्ट्र शाहीर म्हणजेच कृष्णराव साबळे उर्फ शाहीर साबळे ह्याचा जीवनावर , केदार शिंदे दिग्दर्शित व प्रतिमा कुलकर्णी आणि ओंकार मंगेश दत्त ह्याची पथकथा हा चित्रपट सध्या थेटर्स मध्ये आला आहे , आणि शाहिरांच्या आशिर्वादामुळेच कि काय , चित्रपटाला खूप छान प्रतिसाद आहे.




हा एक जीवनपट असल्याने , खूप साऱ्या गोष्टी ज्या आतच पिढीला माहित च नाही आहेत , त्या मुलांना तसेच ज्यांना शाहीर ह्याचे काम , तसेच नाटकं , गाणी माहित नाही , त्यांना मंत्रमुग्ध तसेच खूप शिकवणारा हा चित्रपट म्हणता येईल.


स्वतंत्र पूर्व आणि स्वतंत्र नंतर असा काळ असला तरी , बऱ्याच गोष्टी शी प्रेक्षक स्वतःशी संबंध लावू शकतो. एवरेस्ट एंटरटेनमेंट , केदार शिंदे फिल्म्स व ऑगस्ट एंटरटेनमेंट ह्याचा एकत्र असण्याने हा चित्रपट लोकं समोर आला आहे.


एक व्यक्ती किती नशीबवान असतो , व ते नशीब फक्त दाखवण्या पेक्षा त्याचा बरोबर मेहतेची साथ असेल , तर कोणते हि काम पूर्ण होतच. कृष्णराव ह्यांचा लहानपणीच त्यांचा सुरेल आवाज , व त्यातील प्रत्येक पोवडा, भक्ती गीतं असे कान देऊन ऐकणे हाच एक प्रेक्षक म्हणून काम होऊ शकत.



त्यातील काही सुरुवात ही १९४६ पासून सातारा मध्ये झाली , ज्याचा उल्लेख चित्रपटात आहे.

शाहीर ह्यांना साने गुरुजी , हिराबाई बडोदेकर , संत गाडगे महाराज , असे दिग्ज मंडळी लाभली व त्यांचा सानिध्यतून त्यांना खूप काही गोष्टी करता आल्या.


चित्रपट मुख्यतः शाहीर ह्यांचे सुरुवातीचे दिवस , कष्ट , परिस्थिती , निर्णय , क्षमता , खरी बाजू अश्या एक न अनेक गोष्टी वर प्रकाश टाकतो, म्हणून च बायला अजून जास्त उत्सुकता राहते. कले बरोबर राजकीय संबंध त्यातून काही कार्यक्रम असा सगळं प्रवास खूप हिमतीने व न चाचपडत दाखवण्याचा प्रयत्न खूप च कौतुकास्पद आहे.

तरी काही ठिकाणी " सिनेमॅटिक लिबर्टी " हा एक प्रकार जाणवतो. जो कि थोडा डोक बाजूला ठेवून बगणे योग्य.


शिकण्यासारख्या काही गोष्टी म्हणजे कष्ट करण्याची तयारी , जिद्द , स्वतःला अद्ययावत करणे , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आयुश्यात काहीही झाले तरी आपण काम करत राहणे " THE SHOW MUST GO ON " , हा एक मंत्र पाळणे.




चित्रपट बघितल्या नन्तर शाहीर न बाबतीत बरीच गोष्टी समजतील. चित्रपटाला भली मोठी स्टार कास्ट आहे - अंकुश चौधरी ,सना शिंदे , अमित डोलावत , अतुल काळे, निर्मिती सावंत , दुष्यन्त वाघ , अश्विनी महांगडे ,शुभांगी सदावर्ते इ .


अंकुश चौधरी ने शाहीर साबळे ह्याची भूमिका चोख केली आहे. त्यांच्या चालीरीती , बोलचाल , सगळे तसेच तसे आत्मसात करण्याचा हा प्रत्यन नक्कीच प्रेक्षकांना भुरळ पडणार.


सना शिंदे , चित्रपटाची अजून एक मोठी आणि तेवढीच महत्वाची भूमिका भानुमती साबळे . साथ देणे , प्रत्येक पटात स्वतःला उभे करणे , लेखणीने शाहीर ह्याचे प्रत्येक कार्यक्रमला साथ देऊन शोभा वाढवणे हा सगळा पट ह्या अभिनेत्री ने खूप छान जुळवून आणला व त्यामुळे चित्रपटाचा दर्जा आणखी वाढला.


इतर सहकलाकारची उत्तम साथ असल्याने , चित्रपटाला अजून लखलखीतपणा आला आणि त्यातून च पप्रेक्षकांचा मनात भिनला हे खरं .

बाकी टेक्निकल गोष्टी छान आहेत.


शाहीर साबळे ह्यांना जवळून , ऐक्याचे असल्यास असल्यास चित्रपट नक्की बगा . IMDb रेटिंग ९.६/ १० आहे.

Recent Posts

See All
bottom of page