पूना कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियानात स्वसंरक्षणासाठी धडे- 107 विद्यार्थिनींचा सहभाग
top of page

पूना कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियानात स्वसंरक्षणासाठी धडे- 107 विद्यार्थिनींचा सहभाग



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि पूना कॉलेज विद्यार्थी विकास मंडळ आणि आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने पूना कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ.आफताब अनवर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.बाबा शेख यांनी केले.


कराटे मास्टर ट्रेनर जितेंद्र यादव यांनी शारिरीक आरोग्य व स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कराटे प्रशिक्षक गोवर्धन यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासंदर्भात प्रात्यक्षिक आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले.


प्रत्येक मुलीने कोणताही प्रसंग येताच त्याला सामोरे जाण्याची क्षमता स्वतःत असावी, त्यांनी आत्मरक्षणासाठी कराटेच्या विविध पद्धती शिकवल्या व आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण दिले. डॉ.नुसरत शेरकर यांनी आरोग्य व स्वच्छतेतून महिलांचे आरोग्य संरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रा. वसुधा व्हाव्हळ यांनी विद्यार्थिनींना व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बाबा शेख यांनी केले तर आभार उप लेफ्टनंट डॉ.शाकीर शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. असद शेख, प्रा. इम्रान पठाण, सौ.रिझवाना खोत, सौ.नजेमा पठाण, सलीम शेख, प्रा. शाहेदा अन्सारी, श्रीमती समीना जमादार आदींनी परिश्रम घेतले.


bottom of page