top of page

Mrs Puja Mandlecha Gandhi to be awarded by Lagori on Womens Day
नमस्कार🙏

माझे नाव पूजा मंडलेचा गांधी

वय 29 वर्ष...

बिझनेस चे नाव स्पर्श एंटरप्रायसेस...


मी सर्व प्रकारच्या wardrobe organizer तसेच किड्स गिफ्ट item and seasonal variety मध्ये डील करते..

माझ्या व्यवसायाची सुरुवात 2019 पासून झाली..

आज माझ्या व्यवसायाला 4 वर्ष झाले आहेत...

व आतापर्यंत माझे 2900 च्या वर कस्टमर तयार झाले आहेत ..


बिझनेस चा वारसा लहान पणा पासूनच मला मिळाला होता..

लग्ना आधी माहेरी trading/ marketing cha business hota..

माझी मम्मी आणि पप्पा हा व्यवसाय करत होते..

पण वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांना कॅन्सर झाला...

मला भाऊ नाहीये व मोठ्या बहीनीचे लग्न झाले होते

तेव्हा मी खऱ्या अर्थाने बिझनेस मध्ये उतरले...मम्मीला मदत करू लागले..

सुरुवातीला सगळ नवीन असल्यामुळं खूप अडचणींचा सामना करावा लागला...

पण हळूहळू सर्व शिकत गेले ..

नंतर 2 वर्षांनी वडिलांचे निधन झाले..

त्यांच्या निधना नंतर खूप पोरकेपणा जाणवू लागला...

नंतर 2 वर्षाने माझे लग्न झाले...

सासर बेलापूर( श्रीरामपूर)...

माहेरी पुण्यात कामाची सवय असल्यामुळे एकडे सासरी पण मला घरात बसून राहायचे नव्हते.

स्वतःची ओळख निर्माण करायची होती..

सुरुवातीला माझ्या मिस्टराना त्यांचा किराणा दुकानात मदतीला जाऊ लागले..

तसेच साईड बाय साईड माझे graduation complete केले...

पण नंतर माझ्या मुलाच्या जन्मानंतर त्याला सोडून दुकानात जाणे जमत नव्हते..

तसेच स्वतःला काहीतरी नवीन करायचे होते..

मुलाच्या जन्मानंतर आम्ही पुण्याला शिफ्ट झालो पण पुन्याला गेलो आणि लगेच lockdown झाले

त्यामुळे 2 वर्षात खूप अर्धिक नुकसान झाले..

येथे पुण्यात आल्यावर माझ्या बहिणीने मला घरगुती बिझिनेस बद्दल नवीन नवीन कल्पना सुचवल्या..

माझ्या सासरी खीच्चे कुरडई पापड असे उन्हाळी पदार्थ खूप घरगुती बायका बनवतात त्याची पुण्यात खूप मागणी आहे असे पदार्थ तू इथे विक असे तिने सुचविले .

मग मी इकडे माल मागविला..

सुरवातीला नवीन असल्यामुळे व lockdown mule खूप कमी ऑर्डर येत होत्या..

मग हळूहळू लोकांना मी त्यांच्या घरी जाऊन माल देऊ लागले..

Red zone area मध्ये सुद्धा मी त्यांना सर्व ऑर्डर टाईम मध्ये पोहचवत होते...

भीती पण वाटायची कारण घरी माझा 1 वर्षाचा लहान मुलगा पण होता...

बाहेरून आले की लगेच त्याच्याकडे n जाता सर्व आवरून जायचे..

त्यानंतर मग referance ni customer वाढत गेले..

पुण्याच्या बाहेरच्या पण ऑर्डर येऊ लागल्या..आधीच्या कस्टमर चे नातेवाईक व अजून नवीन कस्टमर वाढू लागले..

मग मी कुरिअर नी माल पाठवू लागले..

त्यानंतर दिवाळी मध्ये लायटिंग चा बिझिनेस चालू केला.त्याला ही चांगला response milala..

पण कालातरा ने आम्हाला परत श्रीरामपूर ला यावे लागले...

Lockdown मुळे खूप नुकसान झाल्यामुळे सुरवातीला मालासाठी भांडवल पण नव्हते

पण हळूहळू ऑर्डर वाढत गेल्या तसतसे भांडवल पण वाढवले...

मग नंतर ऑर्गनायझर किड्स गिफ्ट item असे नवीन नवीन प्रॉडक्ट add केले

आज थोडे थोडे करता करता माझ्या व्यवसायाला 3 वर्ष पूर्ण होऊन 4थे वर्ष चालू आहेत .

मागच्या वर्षी मला महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन तर्फे recognition award

तसेच sayog venture तर्फे sparkler woman of the year 2022 असे 2 अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत..

माझ्या पप्पांना मुलगा नसल्यामुळे माझ्या दोन्ही मुलीचं माझी ताकत आहे व त्या काही करून दाखवतील हा कायम विश्वास होता..

आज जर ते असते तर खूप अभिमान वाटला असता त्यांना...

आता पर्यंत माझे प्रॉडक्ट पूर्ण भारतात तर भारताबाहेर ही गेले आहेत..

यात खूप समाधान वाटते...

आता पर्यंत माझे 2900 कस्टमर तयार झाले आहेत.

हे सगळे शक्य झाले ते फक्त माझ्या परिवाराच्या आधाराने व मदतीने...

माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात यशात सर्वात मोठा खारीचा वाटा माझ्या मम्मी पप्पानचा व माझ्या बहिणीचा आहे...त्यांच्या मार्ग दर्षणामुळे मी हे सगळं करू शकले..

त्यानंतर लग्नानंतर माझे मिस्टर, सासूबाई, व सासरे हे सुध्दा मला माझ्या कामा मध्ये खूप पाठिंबा व प्रोत्साहन देतात .

आणि सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझा मुलगा स्पर्श..

त्याच्या जन्मा नंतरच मी घरी बसून घर काम सांभाळून मुलाची जबाबदारी पार पाडून काहीतरी करण्याचा विचार केला...

कारण सासरी थोडा ग्रामीण भाग असल्यामुळे मी घराबाहेर जाऊन काही करू शकत नव्हते.

म्हनून मग हा ऑनलाइन बिझनेस चालू केला .

आता मी श्रीरामपूर लां राहते आणि इथून all over India saglya order कुरिअर ने पाठवते ..

शेवटी anushri ma'am आणि टीम लगोरीचे खूप खूप आभार...

मला अवॉर्ड साठी निवड ल्या बद्दल व आमची sucess story Ani struggle सगळ्या पोहचवण्यासाठी..

यामुळे बाकीच्या पण गरजू महिलांना व ज्या घर सांभाळून काही करू इच्छिता त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळू शकेल..

कारण आजची स्त्री एक मुलगी, एक बायको, सून व आई या सगळ्या भूमिका सांभाळून सुध्दा काही करू शकते...


Thank you so much🙏

bottom of page