top of page

Mrs. Aarti Wagh to be awarded by Lagori on Womens Day
व्यवसाय तोच ज्यामध्ये काम करून आपल्याला ग्राहकांना खुश पाहून समाधान मिळतं, झोप सुखाची लागते. स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं माझ्या बाबतीत. हा लेखन प्रपंच स्वतःच्या कौतुकासाठी नाहीये, तो आहे त्या मैत्रिणींसाठी ज्यांना असं वाटतं की "मी तर काहीच करू शकत नाही" अगं तू ठरवलं तर नशीब बदलू शकतेस.. ही परिस्थिती काय चीज आहे..!

वय वर्ष 19, 12वीत आलेल्या अपयशाने खचलेली, घरच्यांचे टोमणे पोटभर मिळालेली पुढे शिकता शिकता स्वतःच्या ट्युशन सुरू केल्या, काय माहीत होतं ते इतकं कौतुक आणि माणसं जोडून देईल..2012 साली सुरू केलेला व्यवसाय जोमाने चालला तब्बल 2019 पर्यंत. सगळा एकटीने सुरू केलेला, एकटीच्या जीवावर वाढवलेला..भाड्याची जागा, बेंच, सगळं सुसज्ज,बरोबर फर्स्ट क्लास मध्ये बीसीएस आणि घरच्यांनी लग्न लावून देऊ नये लवकर म्हणून एमसीएस.. हाहा...नशिबातल्या गोष्टी बदलत नसल्या तरी खूप शिकवून जातात, आलेल्या कोरोनाने आणि लग्नात झालेल्या अपेक्षाभंग आणि फसवणूकीने बरंच काही शिकवलं.पदरी 2 महिन्यांचं बाळ आणि त्याची जबाबदारी पोटात असल्यापासून एकटीवरच..मास्टर इन कॉम्पुटर सायन्सची पदवी क्लासेस च्या ओघात मागे पडली आणि मग पुन्हा सुरू झाला 2 पोटांसाठी कमवण्याचा प्रवास..


काय करता येईल बाळाला घेऊन, नव्याने पुन्हा शिकून क्रिएटिव्ह डोकं वापरून आर्टिफिशल फुलांचे दागिने बनवायला सुरुवात केली.. ऑर्डर्स आल्या, कौतुक मिळालं..नवखी होते, पाय रोवायचे होते पुन्हा जीवनाच्या मातीत घट्टपणे,सिमेंटने बनतात ना.. अगदी तसे. घरी जाऊन, कस्टमर्स ना समोर ट्राय करायला लावून अगदी बाय हॅन्ड डिलिव्हरी देऊन विश्वास मिळाला.त्यात सिझन प्रमाणे कृष्णाचे, हळदी, मेहंदीचे, हलव्याचे दागिने साथीला होतेच.. खूप प्रेम मिळालं. बस जगायला तो एक बुस्टर होता. बाजूला पुन्हा अभ्यास सुरू होता, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस सुरू होते.आपलं ठीकाय हो, पण मुलासाठी तरतूद म्हणून फिक्स इन्कमची गरज होतीच..

शाळा कॉलेजची हौस आणि मनातलं कागदावर उतरवून हलकं व्हावं म्हणून लिहायला घेतलं, तिथंही अनपेक्षित यश मिळालं.. आज दिवसागणिक 100-500 वाचकसंख्या वाढते, आवर्जून कथेचा पुढचा भाग कधी येणार हे विचारलं जातं तेव्हा बरं वाटतं खूप..रोख रकमा, कथा कवितानी मैफिली गाजवल्या,कौतुक मिळालं,कथा ऑडिओ फॉरमॅट मध्ये यूट्यूबच्या एका चॅनेलने कॉपीराईट सह विकत घेऊन प्रकाशित केली..जगायला बळ मिळालं.. आजही मिळतंय...

सांगायला अतिशय आनंद होतोय की मागच्या तीन वर्षांत आयुष्याची आणि व्यवसायाची विस्कटलेली घडी बसवण्यात यश आलंय..माहेरच्यांच्या, खरं तर आईच्या जास्त साथीने.. कारण माझ्या मुलाकडे माझ्या अनुपस्थितीत लक्ष देऊन कधीही न फिटणारे उपकार आज तिचे आहेत...पुन्हा फिनिक्स प्रमाणे भरारी घेऊन आज सेल्सफॉर्स डेव्हलपर म्हणून नामांकित कंपनी मध्ये काम करतेय, ज्या व्यवसायाने जगायचं बळ दिलं आजही तो शनिवार रविवार तितक्याच प्रामाणिकपणे करते..इतकंच सांगते की एक स्त्री अनेक स्त्रियांना पुढे नेऊ शकते आणि स्वतःही साथीने पुढे जाऊ शकते.

aartis_floral_hub

- आरती अविनाश वाघ

follow her on social media :

Instagram Id : aartis_floral_hub

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Rated 5 out of 5 stars.

Great inspiration to everyone and hats off to your hard work and dedication..I kw your focused and sharp goal oriented nature from long ago..but situations has sharpen you to your best..may God bless you..

Like
bottom of page