Book Review : काळेकरडे स्ट्रोक्स
top of page

Book Review : काळेकरडे स्ट्रोक्स


आज मराठी मध्ये लेख लिहावा म्हणतो , खरंतर मातृभाषा मराठी , बोली भाषा मराठी , त्यामुळे कधीतरी मराठी मध्ये लेख लिहावा ही इच्छा होतीच , ह्या लेखानिमित्त ती पूर्ण करून घेतोय ....असो , तर आज चित्रपट समीक्षण नाही , तर पुस्तकाचा रिविवं म्हणजे समीक्षण करणार आहे. मी म्हणतोय ते पुस्तक म्हणजे साहित्य अकादमी युवा पूरस्कृत काळेकरडे स्ट्रोक्स .

लेखक प्रणव सखदेव


तर मुळात , मी काही इथे गोष्ट सांगणार नाहीये , ती तुम्हाला पुस्तक वाचूनच अधिक जास्त आवडेल , समजेल अशी माझी खात्री आहे .

ही गोष्ट आहे तीन व्यक्ती ची सानिका , सलोनी आणि समीर ची .

सुरुवात एकदम छान आणि शुभ्र आहे . अगदी कथे सारखी . आणि पुढे ती अजून शुभ्र होतीय , एक एक पात्र जेव्हा खुलू लागत , जेव्हा त्या पात्राची स्वतःला ओळख होती , तेव्हा ती पात्र अजून उठून दिसतात . तसच काहीस ह्या कथे बाबतीत आहे . समीर आणि सलोनी , नन्तर समीर आणि सानिका अश्या तीन मित्रांमध्ये किती आणि कोणते प्रसंग येतात , आणि त्याला ते कसे सामोरे जातात, ह्यावर कथा पुढे जाते .

उत्कृष्ठ लिखाण , त्यात अगदी भाव उतरले आहेत अस म्हणता येईल . जवळ पास २२० पानाचे हे पुस्तक , आपल्याला आतून कधी हळवं करून , तर कधी राग येऊन , कधी दया येऊन सांगेल की ही कथा , किव्हा हा प्रसंग आपल्या आजूबाजूला झाला आहे , किव्हा होत असावेत . अश्या ह्या पुस्तकाने मला भारावून सोडले .

तुम्ही ही हे पुस्तक नक्की वाचा . खरेदी करण्यासाठी लिंक खाली देत आहे : https://rohanprakashan.com/product-author/pranav-sakhdeo/

लिंक ला क्लिक करून 5 पुस्तकाचा संच आजच ऑर्डर करा ...

वाचाल तर वाचाल ....

धन्यवाद ....


आपला

नील देशपांडे

(लेखक , डिजिटल मार्केटर , कन्टेन्ट रायटर )


bottom of page