top of page

व्हिक्टोरिया - एक रहस्य

ऱ्हसमय कथा नेहमीच आपल्याला फॅसीनेट करत असतात. सस्पेंस थ्रिलर चित्रपट आपल्याला आनंद आणि त्या कथांवर विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडतो. तसाच काहीस ह्या चित्रपटाबाबतीत आहे . कथा उत्तम आहेच सोबत कथेचा ग्राफ पण खूप छान टिकवला आहे.

एक राह्स्म्य हॉटेल आणि त्या बद्दलच्या उडणाऱ्या अफवा ह्या बद्दल हा चित्रपट आहे . तसेच एक कपल तिथे आल्यावर गोष्टी कश्या बदलतात आणि व्हिक्टोरिया म्हणजे नक्की काय आणि त्याच रहस्य कसं उघडकीस येते , ते येत कि नाही ? ह्या बद्दल चा हा चित्रपट आहे.


पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. तसेच ह्या तीन पक्की एक व्यक्तीचे विल्लनिश क्यारेकतर पण दाखवले जात आहे , जे खूप इंटरेस्टिंग आहे.


आता टेकनिकाल गोष्टींबाबतीत बोलायचं झालं , तर सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपट शूट करण्याची कला. जी असते एका डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी कडे . जी उत्तम केली आहे , सोपान पुरंदरे . उत्कृष्ट असे सीन्स आणि कॅमेरा ची उत्तम जाण. हे प्रामुख्यने दिसून आले आहे.


डिरेकशन पदार्पण ज्यांनी केलाय ते विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक ह्यांचे अभिनंदन. पदापर्णत इतका मस्त चित्रपट स्वतः लिहून दिग्दर्शन करणे तसे कमालीचे challenge च आहे, जे खूप मस्त डिरेकशन टीम ने पार पडलाय.


कोणत्या हि चित्रपटाला लागते ती आर्थिक साहाय्य , जे कि आनंद पंडित मोशन पिक्चर्स ने दुरा सांभाळत ऐश पंडित , विशाल शहा आणि राहुल दुबे ह्याचा साथीने पार पडलाय.


ऱ्हसमय कथे मध्ये सस्पेन्स टिकवणे खूप महत्वाचे असते , ते टिकवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे , तरीही गोष्टी काही प्रमाणात प्रेडिक्टबल आहे .

चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युजिक आपल्याला ऱ्हसमय फील आणत, जे कि खूप भारी आहे.


तीनही कलाकारांची ऍक्टिंग छान झाली आहे. त्यातही सोनाली कुलकर्णी ह्यांची ऍक्टिंग एका क्षणी ओढून- ताणून अभिनय वाटला.

चित्रपटाचा इन्टर्वल नंतरचा भाग स्पीड उप केल्या मुळे , चित्रपटाला एक छान गती आहे , त्यामुळे बगण्यात अजून मजा येऊ शकते.


बाकी चित्रपटाचे मुख्य भाग व्ही . एफ .क्स वर आहे , जे कि छान आहे.

विटोरीय चे रहस्य शेवटी उघडकीस येते कि नाही हे मात्र चित्रपट बगुन तुम्हीच ठरवा !


बाकी चित्रपटगृह होऊसफूल करा , आणि आपल्या परिवारसोबत , मित्र- मैत्रीणी सोबत हा चित्रपट नक्की बगा.


IMDb रेटिंग ८. ४/१० आहे .

0 comments
bottom of page