top of page

कराडच्या नील कडून सातारच्या सलमान चित्रपटाचे समीक्षण

खरतर मराठी चित्रपटाची सध्याची झेप हि जागतिक पातळीवरच्या एका रेकॉर्ड सारखी जोमात सुरु आहे. झिम्मा जगात धुमाकूळ करत असतानाच , त्या नन्तर मी वसंतराव , अनन्या , पॉंडिचेरी , पैठणी सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा , नन्तर मस्त डार्क कॉमेडी चित्रपट वाळवी , असे दर्जेदार सिनेमे मराठी चित्रपट सृष्टी मध्ये घडत आहेत ह्याचा अभिमान प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकाला असायला हवा.

त्यातच एक उत्तम कथा असलेल्या , कडक सवांद असणारा " सातारचा सलमान " ह्या चित्रपटाची एन्ट्री झाली आणि अक्षरशः महाराष्ट्राला त्यांचा "हुक स्टेप" वर नाचायला लावलं .


चित्रपट अगदी साधा सोपा आहे . खरंतर एका अभिनेत्याचा "माणूस ते अभिनेता" बनण्याचा प्रवासच.

सुयोग गोरे ने अमित काळभोर नावाची भूमिकेत स्वतःला गुरफुटून घेतल. अभिनेता बनायचं स्वप्न साकारण्यासाठी मिळेल ते काम करत पुढं येऊ पाहणारा एक मुलगा. शिकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे ध्येय पूर्ण करण्याची धमक आणि स्वबळावर लढ्याची जिद्ध आणि मनाचा निश्चय.

ह्या त्रिकुटाचा जोरावर अमित अभिनेता होतो कि नाही , हे सांगणारा हा चित्रपट आहे.


दर्जेदार सहकलाकार असले कि सिनेमा पण उत्तम होतो अस म्हणतात, ह्या चित्रपटाबाबतीत सुद्धा असच आहे. मकरंद देशपांडे , आनंद इंगळे ह्या सारखे मुरलेले अभिनेते एकत्र एका चित्रपटात असल्या नन्तर

"और क्या चाहिए?"


अक्षय टंकसाळे , हा सध्या चा तरुण पिढीचा एक आवडता कलाकार म्हणून सगळीकडे चर्चेत आहे .साधा सोपा सरळ आणि निरागस अभिनय करत , त्याने कितीएक चित्रपटामधून स्वतःला सिद्ध केलय.


सायली संजीव आणि शिवानी सुर्वे , ह्या दोन अभिनेत्री ह्यांनी चित्रपट अजून उत्तम बनवायचा प्रकियेत मोठा वाटा घेत अभिनयाची उत्तम साथ दिली आहे .


कौतुक करायचं म्हणजे आपले आवडते अभिनेते -लेखक -दिग्दर्शक हेमंत ढोमे ह्यांचे. उत्तम लिखाण आणि

"वरचा क्लास" दिग्दर्शन .आणि हो " I Want Tumeric" ने धिंगाणा घातलाय . ३ दिवसात २.१K views . मस्तच.


एकूण काय , चित्रपटाची स्क्रिप्ट भारी तर चित्रपट भारी . हेच खरंय.


अमितराज सर न च संगीत , आणि आदर्श शिंदे सर न चा आवाज म्हणजे सोन्याहून पिवळं.


Reliance Entertainment आणि Texas Studios चे प्रकाश सिंघी ह्यांचे खूप कौतुक, असा हटके विषय लोकांसमोर आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मराठी चित्रपट दूरवर पोचावा ह्या संकल्पाला त्यांनी हातभार लावला .


IMdb Rating ७.८/ १० वर पोचून , चित्रपट जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात लागला आहे . नक्की बगा .


ट्रेलर बघितला नसेल तर लिंक वर क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=i7VLGo1dgWQ

0 comments
bottom of page